*वधू-वरांनी वऱ्हाडी मंडळींना दिली मतदानाची शपथ*
लातूर, दि. २७ : जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात सहभागी होत लातूर येथील वधू-वरांनी आपल्या लग्नासाठी उपस्थित वऱ्हाडी मंडळींना मतदानाची शपथ दिली.
एकुर्गा जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक विनायक सूर्यभान सावंत यांचा मुलगा व्यंकटेश आणि कळंब तालुक्यातील पाडोळी येथील श्रेया सरवदे यांचा विवाह सोहळा २६ मार्च २०२४ रोजी थोरमोटे लॉन्स येथे झाला. यामध्ये लातूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप मोहिमेंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतला.
लग्न सोहळ्याला उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक यांना वधू-वरांनी लोकशाहीवर निष्ठा ठेऊन मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निर्भयपणे कोणत्याही दबावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता ७ मे २०२४ रोजी मतदान करण्याची शपथ दिली.
लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप कक्षातील मधुकर ढमाले, रामेश्वर गिल्डा, रावसाहेब भामरे, विजय माळाळे, डॉ. अनिल जायभाये तसेच वधू-वरांचे माता-पिता, नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
0 Comments