Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वडीलांचे छत्र हरवले, आईला मानसिक आजार जडला आम्ही कसे व कोठे रहावे.संस्था चालकांच्या त्रासामुळे वडिलांचा मृत्यू

वडीलांचे छत्र हरवले, आईला मानसिक आजार जडला आम्ही कसे व कोठे रहावे.संस्था चालकांच्या त्रासामुळे वडिलांचा मृत्यू

रहायला घर नाही. ना शिवारात शेत..

आईच्या शोधत निघालेल्या ३ अल्पवयीन मुली उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात आढळल्या..

उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी (२९ मार्च) रात्री साडेदहाच्या सुमारास अंधारात ३ अल्पवयीन मुली रडत असलेल्या संशयास्पद अवस्थेत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नाईक यांना आढळून आल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलींची विचारपूस करीत धिर देत रेल्वे पोलीस व उदगीर शहर पोलीसांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले.

    घटनास्थळी रेल्वे पोलीस व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी धाव घेतली व तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता कळाले की, सुप्रिया दयानंद घोडके (वय १७ वर्षे, इयत्ता अकरावी ढाळेगाव ता. अहमदपूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.), तर शुभांगी दयानंद घोडके (वय १५ वर्षे, इयत्ता नववी, यशवंत विद्यालय अहमदपूर), प्रांजली दयानंद घोडके वय १३ वर्षे, इयत्ता सातवी, यशवंत विद्यालय अहमदपूर) सर्व रा. अहमदपूर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास असतात अशी माहिती या तिन्ही सख्या बहीनींच्या सांगण्यानुसार समोर आली.

    त्या मुलींची आई ३ दिवसापासून बेपत्ता असून आई टेन्शन घेऊन संस्थाचालकाकडे रायगड जिल्ह्यात गेली असावे म्हणून त्या मुली आपली पुस्तके विकून मिळालेल्या पैशातून बसचे तिकीट काढून उदगीरला आले. व रेल्वेने रायगडला जाण्यासाठी निघाले होते.

    पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी तिन्ही मुलींना महिला पोलीस मार्फत पोलीस ठाण्यात आणून त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. शनिवारी दुपारी मुलीच्या आईला व नातेवाईकांना संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले असता पुढील हकीकत समोर आली.

     मुलींचे वडील दयानंद निवृत्ती घोडके (शिक्षण बी.पी.एड.) कर्जबाजारी होऊन रायगड जिल्ह्यातील नागोठणे ता. रोहा येथील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेचे संस्था चालक जी.के.डोंगरगावकर यांना साडेतीन लाख रुपये डोनेशन देऊन सन २००१ मध्ये नोकरीला लागले होते. संस्थेने त्यांना सन २०१२ मध्ये नोकरीवरून काढून टाकल्याने संपूर्ण कुटुंब अहमदपूर येथे वास्तव्यासाठी आले. त्यानंतर न्यायालयातून निकाल लागला व २०१९ ते २०२१ मध्ये पुन्हा ते नोकरीवर रुजू झाले. मुलीच्या वडीलांना संस्थेने इतका त्रास दिला की, याच विवंचनेत व वैफल्यातून एका वर्षापूर्वी मुलींच्या वडीलांचे ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आईला मानसिक धक्का बसला. त्यामुळे आईला मानसिक आजार जडला. आजघडीला आई स्वतः ला सांभाळू शकत नाही. आम्हाला कसे सांभाळणार, आई मनोरुग्ण अवस्थेत आयुष्य जगत आहे. ती संस्था चालकाकडे जाऊन आत्महत्या करणार असे म्हणून गेली होती. त्यामुळे आम्ही रायगड जिल्ह्याकडे निघालो होतो. असे माहितीतून समोर आले. 

    तिन्ही मुली भांबावून गेल्या असून त्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. आम्ही पोलीस ठाण्यात राहणार. किंवा इतर ठिकाणी आम्हाला ठेवा आम्हाला आई सोबत जायचे नाही. ती मानसिक आजारी आहे. ती स्वतःला सांभाळू शकत नाही. ती आम्हाला कशी सांभाळू शकणार ? असा समाज यावेळी तिन्ही मुलींनी पोलीसांना बोलावून दाखविले.

मुलींची आई विष प्राशन करुन आत्महत्या करणार..

     रायगड जिल्ह्यातील डॉ नेल्सन मंडेला आश्रम शाळेने अन्याय केला. वेतन थकले. माझ्या पतीचे यामुळेच मृत्यू झाला. मला न्याय द्या म्हणून मुलींची आई प्रियंका दयानंद घोडके (वय ३४ वर्षे, रा. अहमदपूर जि.लातूर) यांनी २८ मार्च रोजी रायगड पोलीस अधिक्षक व जिल्हा अधिकारी यांना विष प्राशन करुन आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे. सदरील विषयी त्या कुंटुंबावर अन्याय झालेला दिसतो. मुलींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. तिन्ही मुली आई सोबत जायाला तयार नाहीत.तिन्ही मुलींची मुरुड येथे ३० मार्च रोज शनिवारी रात्री बाल सुधार गृहात रवानगी केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात