कौळखेड व माळेवाडी येथे मतदार जनजागृती अभियान
उदगीर:तालुक्यातील कौळखेड व माळेवाडी या गावात उदगीर चे कर्तव्य दक्ष उपविभागीय अधिकारी श्री सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार श्री राम बोरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली कौळखेड सज्जाचे तलाठी अमोल रामशेट्टे, ग्रामसेवक राठोड,ग्रामसेवक अनिता शेवाळे, BLO संजय चिखले, उपसरपंच रवी पाटील, उपसरपंच अजय पाटील यांचे उपस्थितीत मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला असून सदर कार्यक्रमात १००% मतदान करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ८० वर्षांवरील वृद्धांना घरोघरी जाऊन मतदान करता येणार असेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील सर्व पात्र मतदारांना voter helpline या ॲप च्या माध्यमातून नोंदणी करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले ...
0 Comments