उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांंडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरादार, पोलीस शिपाई गायकवाड यांच्या डीबीच्या पथकाने डोंगरशेळकी शेत शिवारातील नाल्यात गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी १५०० लीटर गुळ मिश्रीत आंबट व उग्र वास येत असलेले रसायण व गावठी हातभट्टी दारु ५०० लीटर अंबट व उग्र वास येत असलेली एकुण ४२ हजार ५०० रुपये किमतीची रसायनसह गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालायाच्या डीबीच्या पोलीस पथकाने रविवारी (१७ मार्च) सकाळी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी १५०० लीटर गुळ मिश्रीत आंबट व उग्र वास येत असलेले रसायण व गावठी हातभट्टी दारु ५०० लीटर अंबट व उग्र वास येत असलेली एकुण किंमत ४२ हजार ५०० रुपयाचा बेकायदेशीर रित्या लोखंडी बॅरल व प्लास्टिकचे बॅलर मध्ये विक्री करण्याचे उद्धदेशाने कब्जात बाळगलेला मिळून आला व पोलिसांनी छापा मारतांना पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळुण गेला.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश गंगाधराराव कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात राम काशिनाथ राठोड (रा. डोंगर शेळकी तांडा ता.उदगीर) यांच्या विरोधात रविवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments