*मृद व जलसंधारण विभागा अंतर्गंत बंधाऱ्यासाठी ३० कोटी रुपयाचा निधी मंजूर*
*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
उदगीर : मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी उदगीर आणि जळकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये कोल्हापुरी बंधारे उभारण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा निधी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे मतदार संघातील शेकडो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने दि.१४ मार्च रोजी अध्यादेश काढण्यात आला असुन एकूण
२९ कामासाठी ३० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यातील गुरधाळ, गुडसुर , गुत्ती, येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ४५ लक्ष २४,४००/- रु,
जळकोट तालुक्यातील हळद वाढवणा, पाटोदा, माळहिप्परगा, येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ३ कोटी ९५ लक्ष १२९७०/-, मल्लापुर, शिरोळ जा. येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ६१ लक्ष २६,८००/- तर जानापुर, शिरोळ, कौळखेड येथील बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ४० लक्ष ५४, ९१०/- ,
जळकोट तालुक्यातील मरसांगवी, डोंगरगाव, हळद वाढवणा येथील बंधाऱ्यांसाठी
४ कोटी ५१ लक्ष ४१०८०/-, कुमदाळ, गुरधाळ, मल्लापुर येथील बंधाऱ्यांसाठी
४ कोटी ४४ लक्ष २३६५०/- तर कोनाळी डोंगर, मरसांगवी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ३३ लक्ष ७९०००/- असे एकुण ३० कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवुन आणणा-या बंधा-याला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मतदार संघातील तमाम शेतकरी बांधवांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments