वंचित बहुजन आघाडीकडून नरसिंगराव उदगीरकर यांना लातूर लोकसभेची उमेदवारी जाहीर
उदगीर:येथील रहिवासी असलेले नरसिंगराव उदगीरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लातूर लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते,त्यांनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला,परंतु महाविकास आघाडीने लातूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला,अखेर नरसिंगराव उदगीरकर यांना लातूर लोकसभेची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे, नरसिंगराव उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्याने लातूर लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार हे मात्र निश्चित झाले आहे.
0 Comments