शुरैम शेख या बालकाचा पहिला रोजा
उदगीर:प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला सुरुवात झाली असून पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून उदगीर शहरातील शुरैम इब्राहिम शेख हा मुलगा जगाचा निर्माता अल्लाहप्रती आपल्या संवेदना व्यक्त केला. सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी ६:३६ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणी पाण्याचा एक घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
0 Comments