निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष कार्यान्वित
लातूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली आहे. याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता विषयक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष 24 तास सुरु राहणार आहे.
लातूर जिल्ह्यात तसेच लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या 02382-224477 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित राहणार असून या कक्षात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी दूरध्वनीद्वारे प्राप्त तक्रारींची दखल घेवून पुढील आवश्यक कार्यवाही करतील. तसेच निवडणुकीसंदर्भात मदत हवी असल्यास 02382-224477 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
0 Comments