भारतीय जनता पक्षात अनेक कार्यकर्त्यांचे जाहीर प्रवेश
उदगीर विधानसभा प्रमुख माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब यांच्या निवासस्थानी व प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश व नियुक्ती केले. सरचिटणीस रामेश्वर कोटलवार, उपाध्यक्ष साईप्रसाद वाघमोडे, सोशल मीडिया प्रमुख वैभव दवणीपुरगे, चिटणीस सुनील फपाळ यांची पदाधिकारी म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते व भाजपा तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे, युवा मोर्चा शहरध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व उपस्थित युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना साहेबांनी मार्गदर्शन केले.
यावेळी युवा नेते अमोल भैया भालेराव,भाजपा तालुका उपध्यक्षा शिवकर्ना अंधारे,युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रसाद नाईकवाडे सरचिटणीस प्रितम विरशेटे, उपाध्यक्ष वैष्णवी लाळे, साक्षी सदानंदे, सचिव सूरज लासूने, प्रथम सदानंदे, ऋषिकेश जगळपुरे, अभिनेत चिकटवार, विध्यार्थी प्रमुख मंगेश येरकुंटे, विध्यार्थी सहप्रमुख प्रसाद पांढरे, अभिषेक एनीले आदी पदाधिकारी उपस्थित होते...
0 Comments