उदगीर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना राबवाव्यात,बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कांबळे
उदगीर:तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे, ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई भासण्या अगोदरच पंचायत समितीने ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना राबवाव्यात,नगरपरिषदेने उदगीर शहरात पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात यावे अशी मागणी बहुजन विकास अभियान संघटनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.उदगीर शहरात विविध ठिकाणी विनाकारण वाया जाणारा पाणी रोखण्यात यावा,शहरात आठ दिवसाला पाणी सोडण्यात येते ते पाणी वाया जाणार नाही याची दक्षता नगरपरिषदेने घ्यावी अन्यथा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,शहरी व ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे त्या त्या ठिकाणी उपायोजना करावी,तळ्यातील विहिरीतील बोअरचे पाणी लोकांना पिण्यासाठी सांडपाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आता पासून पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली,यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड,लक्ष्मण आडे,ज्ञानेश्वर पवार,आकाश पाटील,शेख सरोवर, पांडुरंग मस्के,अनिल भोसले,नरसिंग गुरमे,आदी उपस्थित होते.
0 Comments