Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नेहरू मेमोरियल हायस्कूल तालुक्यात द्वितीय

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नेहरू मेमोरियल हायस्कूल तालुक्यात द्वितीय

उदगीर:राज्य सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत उदगीर तालुक्यातील तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल तोंडार केंद्रात प्रथम तर उदगीर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकविल्याने दोन लाख रुपयांच्या पारितोषिकांची मानकरी ठरली आहे,नेहरू मेमोरियल हायस्कूल मध्ये सर्व परिपूर्ण भौतिक सुविधा व सर्वगुणसंपन्न असणाऱ्या नेहरू मेमोरियल हायस्कुलचे उदगीर तालुक्यात कौतुक होत आहे,तालुका स्तरीय समितीने शाळेस भेट देऊन शाळेतील सर्व उपक्रमाची तपशीलवार पाहणी केली होती, शाळेने सर्व निकष पूर्ण करून केंद्रात प्रथम तर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकविल्याने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी, उपाध्यक्ष बस्वराज बिरादार, सचिव मल्लिकार्जुन बिरादार, व संस्थेचे सर्व सदस्यांनी   माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे,गटशिक्षणाधिकारी शेख एस.के.शिक्षणविस्तार अधिकारी नितीन लोहकरे,केंद्र प्रमुख मरल्लापले यांचे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शेटकार यांनी आभार मानले, त्याच बरोबर शाळेतील सर्व कर्मचारी शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी पालक व गावातील नागरिकांचेही आभार मानले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात