चोंडी येथे अनैतिक संबंधातून एकाचा दोरीने गळा आवळून खुन; ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील चोंडी येथे एकाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुक्रवारी (२६ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत ऊर्फ बाबु सुदाम बिरादार, वय ५० वर्षे, (रा.चोंडी ता. उदगीर) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ एप्रिल रोजी उदगीर तालुक्यातील चोंडी येथे मयताच्या रहात्या घरी आरोपीनी गैरकायदयाची मंडळी जमवुन यातील मयत नामे सूर्यकांत ऊर्फ बाबु सुदाम बिरादार (वय ५० वर्षे, रा.चोंडी ता. उदगीर) यांचे आरोपी महिला केवळबाई बिरादार हिचे सोबत अनैतिक संबंध असल्याचे कारणावरून यातील आरोपीनी मयताचे डोळयात मिरची पावडकर टाकुन काठीने मुक्कामार देवुन दोरीने गळा आवळुन खुन केला. व तसेच मा. जिल्हाधिकारी लातुर यांचे जमाव बंदी आदेशाने उल्लंघन केले आहे.
याप्रकरणी श्यामराव शिवाजी वाघमोडे (रा. उंदरी(प.मु.), ता. मुखेड, जि. नांदेड, हा. मु. उदगीर, जि. लातूर) यांच्या फिर्यादीवरून वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात गु.र.नं.१३१/२०२४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, भादवी, व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार, बालाजी ऊफ पप्या संजीव बिरादार, केवळबाई संजीव बिरादार, कचरू जिवण डोईफोडे, लक्ष्मण जीवन डोईफोडे, विलास जिवण डोईफोडे (सर्व रा. चोंडी ता. उदगीर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भिमराव गायकवाड हे करीत आहेत.
दोन तसा निर्दयीपणे अमानुष मारहाण..
मयताच्या घरी वरील आरोपी घुसून मयताच्या डोळ्यात मिरची पावडर घातले व त्यानंतर काठीने बेदम मारहाण केली व दोरीने गळा आवळून खुन केला. सदरील घटना तब्बल दोन तास चालली दरम्यान मयताला खुप त्रास सहन करावा लागला. यावेळी मयताच्या मदतीला गावातील लोक आले असता त्यांना जवळ येऊ दिले नाही. मयतास सहा मुली असून सर्व विवाहित आहेत.
0 Comments