शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर एस.एस.टी पथकाने ७ लाखांची रोकड पकडली
उदगीर तालुक्यातील शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर कर्नाटक राज्यात मोटारसायकलवर बॅग मध्ये घेऊन जाणारी सात लाख रुपयांची रक्कम एस एस टी पथकांने पकडून जप्त केली आहे,२६ एप्रिल रोज शुक्रवारी ४:३० वाजता उदगीर कडून कर्नाटक राज्यातील बावलगावंकडे एम.एच.१२ एन.टी ६३२७ या दुचाकीवरून जात असताना शिरोळ जाणापूर चेक पोस्टवर संदीप स्वामी राहणार बावलगावं ता औराद जि,बिदर यांच्याकडून सात लाख रुपयांची ५०० रुपयांच्या १४०० नोटा एस.एस.टी पथकाने जप्त केल्या याची माहिती गटविकास अधिकारी सुरोडकर यांना देण्यात आली, सुरोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जप्त करण्यात आलेली रक्कम २६ एप्रिल रोज शुक्रवारी रात्री ८ वाजता लोखंडी पेटीत जमा करून लोखंडी पेटीला शील मारून उदगीर येथील निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आले,ही कारवाई एस.एस. टी.पथकाचे हेडगापुरे पी.एम.संजयसिंग चव्हाण, व्ही आर वाघमारे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी केली आहे
0 Comments