मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा सोडला
उदगीर:मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र महिना म्हणजे रमजान, पवित्र रमजान महिन्याची सुरुवात १२ मार्च पासून सुरवात झाली,१२ मार्च रोजी मुस्लिम बांधवांनी पहिला रोजा धरून पवित्र रमजानाची सुरुवात केली, दिवसभर पाणी न पिता काही न खाता उपवास धरला,सध्या धगधगत्या उन्हाची तीव्रता असूनही थेंबभर पाणी न पिता मुस्लिम बांधव रोजा धरतात, रमजान महिन्याचा पहिला रोजा १२ मार्च रोज मंगळवारी सांयकाळची नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ए वन टी हाऊस येथे पहिला रोजा उपवास सोडला यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कांबळे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी पत्रकार समशेर गोलंदाज,लाईक खान,रवी डोंगरे,लक्ष्मण आडे,बंजारा समाजाचे कार्यकर्ते संजय राठोड सोमनाथपुरकर, मानसिंग पवार यांनी मुस्लिम बांधवासमवेत रोजा सोडला.


0 Comments