Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले यांचे सुपुत्र अमित अरविंद नवले यांचे दुःखद निधन

शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले यांचे सुपुत्र अमित अरविंद नवले यांचे दुःखद निधन

उदगीर:शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले यांचे सुपुत्र अमित नवले तसेच  कै प्रोफेसर संजय नवले व सुनिल नवले यांचे पुतणे अमित यांचे आज  रात्री आठ वाजून सात मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे.
अमित मागील चार 8 दिवसापासून एन आर एस हॉस्पिटल पुणे येथे सायनस वर ट्रीटमेंट घेत होते ,त्यानंतर जैन ई एन टी हॉस्पिटल जयपूर येथे सर्जरीसाठी ऍडमिट केले होते सर्जरी करीत असतानाच अमितला ब्रेन्स्त्रोक झाला त्यामुळं त्यास भारतातील प्रसिद्ध अशा नारायणा हॉस्पिटल जयपूर येथे   ऍडमिट करण्यात आले त्याच दोन दिवसापासून व्हेंटिलेटर लागले होते. या ठिकाणी अमितने आठ वाजून सात मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. जे एस पी एम विद्यापीठ पुणे येथे तो बी. टेक कॉम्पुटर सायन्स प्रथम वर्षात शिकत होता त्या ठिकाणी त्याचा स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती पाहून मा. कुलगुरू  यांनी त्याची जे एस पी एम विद्यापीठाच्या IQAC समितीवर  विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.
अमितच्या असे अकाली जाण्यामुळे सर्वांनाच अतिशय दुःख झाले असून किसान शिक्षण प्रसारक परिवार व शिवाजी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी नवले परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
अमितच्या आत्म्यास शांती लाभो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.

Post a Comment

0 Comments

जाहिरात