देविदास कांबळे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव
मुंबई:महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबईच्या वतीने मिळणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार १२ मार्च रोजी नॅशनल सेंटर फार परफार्मिग आर्ट्स (एनसीपीए) जमशेद भाभा नाट्यगृह मुंबई या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आर पी आय (आठवले गट) देविदास कांबळे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार दलित, शोषित, समाजाच्या कल्याणासाठी कार्य करनाऱ्या व्यक्तिस व संस्थेस दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जातो. गेल्या दोन ते तीन वर्ष हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते. २०१९-२०२० या वर्षातील “डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” उदगीर तालुक्यातील सर्व सामाजिक कार्य केलेले तथा साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे अभ्यासक, फुले, शाहु, आंबेडकर चळवळीचे अहोरात्र काम करणारे शहरात गोरगरीब लोकांना न्याय देऊन काम करणारे उदगीर शहरातील व समाजातील एक दमदार वेक्तिमत्व या कामाचा मोठा अनुभव असणारे मा.देविदासजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार १२ मार्च रोजी मुंबई येथे देण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्री मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आले, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,ना. संजय बनसोडे,मा.मंगल प्रभात लोंढा मंत्री कौसल्या रोजगार उद्योजकता तथा पालकमंत्री मुंबई उपनगर, आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्ल उदगीर तालुक्यातील सर्व समाजातून अभिनंदन केले जात आहे.


0 Comments