वाढवणा (बु.) येथे पोवाडा पथनाट्यातून मतदार जनजागृती
उदगीर:लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून वाढवणा महसूल मंडळामध्ये पोवाडा पथनाट्यामधून मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४, ४१ - लातूर लोकसभा मतदारसंघ २३७ उदगीर विधानसभा मतदार संघात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २६ मार्च रोज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता वाढवणा महसूल मंडळात वाढवणा बु येथे मतदार जनजागृती करण्यासाठी पोवाडा पथनाट्य कार्यक्रम संपन्न झाला, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ७ मे २०२४ रोजी १००% मतदान करण्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार श्री.बेंबळगे,मंडळ अधिकारी श्री.गणेश हिवरे,व मंडळ विभागातील सर्व तलाठी श्री.आकाश आलूरे, बालाजी नागरगोजे, कुलदीप गायकवाड, तानाजी शिंदे,परशुराम जाणतीने, सरपंच नागेश थोटे, उपसरपंच श्री. सोनू माळी, सदस्य बाळू काळे,दता बामणे,संगम अष्टुरे, पत्रकार श्री.प्रमोद बिरादार, हुकूमत शेख ,बीभीशन मद्देवाड, सचिन शिवशेट्टे,व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भांगे,घोडके सर,मादळे सर,भाटे सर,वाकळे सर,व वाढवणा महसुल मंडळातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments