Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणाविरुद्ध औसा येथे गुन्हा दाखल. कत्ती व काठी जप्त

हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणाविरुद्ध औसा येथे गुन्हा दाखल. कत्ती व काठी जप्त 

औसा: हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत थोडक्यात माहिती अशी की,लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.
त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक  डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा श्री.सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे स्तरावर अधिकारी अमलदारांचे पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मोहीम हाती घेतली असताना सदर पथकाला २४ मार्च रोजी माहिती मिळाली की,औसा शहरातील याकतपूर मोड परिसरामध्ये दोन युवक हातात धारदार कत्ती व काठी घेऊन दहशत निर्माण करीत फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने  सदर पथकाने तात्काळ याकतपूर मोड परिसरात जाऊन हातात धारदार लोखंडी कत्ती व काठी घेऊन फिरणारे युवक १) रसूल खय्युम शेख, वय २८ वर्ष,राहणार कव्वा नाका, लातूर.२) लखन कैलास रणदिवे, वय ३२ वर्ष, राहणार माताजी नगर, लातूर.यांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी धारदार कत्ती व एक काठी मिळून आली. सदरची कत्ती व काठी जप्त करण्यात आली असून सदर युवकावर
पोलीस ठाणे औसा येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३५ मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलिस  अंमलदार वाडकर, डीगे, हिंगणे, होगाडे, पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात