काजल हिंदुस्थानी यांची ३० मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा
उदगीर:श्रीराम नवमी शोभा यात्रेचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीरच्या वतीने येत्या ३० मार्च रोजी उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर काजल हिंदुस्थानी यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला उदगीर तालुक्यातील हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने आजपर्यंत उदगीर तालुक्यातील ८० गावात प्रचार करण्यात आला ३० मार्च रोजी काजल हिन्ंदुस्थानी यांची हिंदू धर्मसभा व १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत आहेत.
0 Comments