*सामाजिक आरोग्यासाठी "फॅमिली डॉक्टर" संकल्पना आवश्यक-खा.डॉ.अजित गोपछडे.*
उदगीर:धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे उदगीर,देवणी व जळकोट या तालुक्यातील *ऍलोपॅथी,आयुर्वेद,डेंटल,होमिओपॅथी व युनानी या विविध चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांशी सुसंवाद* या शनिवार,दिनांक:-09 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सत्कारमुर्ती नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खा.डॉ.अजित गोपछडे यांनी उपरोक्त उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,डॉ.चेतना अजित गोपछडे,आय.एम.ए.,उदगीरचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पाटील,यु.डी.ए.उदगीरचे अध्यक्ष डॉ.गोविंद सोनकांबळे,निमा,उदगीरचे अध्यक्ष डॉ.राजकुमार घोणसीकर,होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन,उदगीरचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत कोठारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे ,उदगीर डॉक्टर्स वुमेन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ.ज्योती मध्वरे,स्त्रीरोगतज्ञ असोसिएशन,उदगीर च्या अध्यक्ष डॉ.स्वाती पाटील,सामान्य रुग्णालय,उदगीरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण पाटील,आय.एम.ए.उदगीरचे सचिव डॉ.महेश जाधव,निमा,उदगीरचे सचिव डॉ.प्रवीण देशमुख व अमरनाथ खुरपे,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व भगवान धन्वंतरी प्रतिमा पूजन-स्तवन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.महेश जाधव यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ.स्वाती पाटील यांनी करून दिला. याप्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.चेतना गोपछडे यांचा विविध चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या संघटनांच्या वतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ.बाळासाहेब पाटील म्हणाले की नवीन क्लिनिक-दवाखाना-रुग्णालय सुरू करण्यासाठी व रिन्युअल करण्यासाठी विविध विभागांशी संबंधित कागदपत्रे पूर्ण करून सुद्धा अत्यंत गौण कारणास्तव प्रमाणपत्र मिळण्यामध्ये डॉक्टरांना येणाऱ्या अडचणींची व दिरंगाईची माहिती देऊन यासंदर्भात शासकीय यंत्रणाना गतिमानता यावी यासाठी योग्य ते दिशानिर्देश देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण कार्यक्रमा प्रभावीपणे राबविण्यात खाजगी वैदयकीय व्यावसायिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांशी संबंधित योग्य ते सर्व सहकार्य डॉक्टरांना केले जाईल असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना खा.डॉ.अजित गोपछडे म्हणाले की पाश्चात्य संस्कृतीचा अंधानुकरण करताना आहार-विहारांमध्ये केलेल्या बदलामुळे,फास्ट फुड-जंक फूड च्या अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होत चाललेली आहे तथा मधुमेह,उच्चरक्तदाब,कॅन्सर,स्थौल्य,इत्यादी जीवनशैली जन्य आजार निर्माण होत आहेत.अन्न,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करताना रोगनिदान-औषधोपचार-शस्रक्रिया याकरिता जास्त खर्च पडणार नाही व याबद्दल संबंधित कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेत भर पडणार नाही याचा विचार करून आरोग्य रक्षणासाठी प्रत्येक चिकीत्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी रुग्णांवर औषधोपचार करताना रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांचे प्रकृतीनुसार नियमित-संतुलित आहार-विहार व योग-प्राणायाम यासंदर्भात सुद्धा समुपदेशन करणे गरजेचे आहे. संसद सदस्य म्हणून जनतेच्या विविध क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी शत प्रतिशत योगदान देत असतानाच वैद्यकीय व्यवसायिकांच्या विविध शासकीय विभागाशी निगडित तांत्रिक अडचणी व विषयासंदर्भात आवश्यक मदत तथा सदरील प्रक्रिया सहज व सुकर होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी वैद्यकीय व्यावसायिक व समाज यांच्यामध्ये सुसंवाद यामध्ये रोगनिदान शिबिरे व आरोग्य प्रबोधन-समूपदेशन कार्यक्रमांची मोलाची भूमिका आहे.त्यामुळे डॉक्टरांनी आपापल्या परीने यासाठी योगदान देणे अत्यावश्यक आहे असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.गोविंद सोनकांबळे,डॉ.राजकुमार घोणसीकर,डॉ.चंद्रकांत कोठारे यांची शुभेच्छापर समायोचित भाषणे झाली.
सदरील कार्यक्रम प्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या हस्ते क्षयरोगाच्या व्यक्तींना सकस आहार पुरवठा या भूमिकेतून भारत सरकारच्या निश्चय मित्र या संकल्पनेनुसार तीन महिन्यांचा पोषक आहार वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कालिदास बिरादार व डॉ.प्रशांत बिरादार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.जावेद अत्तार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दत्तात्रय पवार,डॉ.श्रीकांत मध्वरे,डॉ.शिवलिंग सोनटक्के,डॉ.संजय चाकूरकर,डॉ.सचिन टाले,डॉ.विजय बिरादार,डॉ.सुनील बनशेळकीकर,डॉ.अजय सोनटक्के,डॉ.दीपक केंद्रे,डॉ.गुरुराज वरनाळे,डॉ.बालाजी बिरादार,डॉ.संतोष बिरादार,डॉ.संगमेश्वर दाचावार,डॉ.राहुल जगताप,डॉ.संजय चिल्लरगे,डॉ.संजीव बिरादार,डॉ.किशोर बुबणे,डॉ.चरणदास गाडेकर,डॉ.योगेश सुरनर,डॉ.प्रवीण बलुतकर,डॉ.राखी वरनाळे,डॉ.शितल जाधव,डॉ.अजित पाटील,डॉ.अंतेश्वर हावन्ना डॉ.हरेश्वर सुळे,डॉ.स्नेहल पाटील डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.रश्मी सुखदेवे,डॉ.प्रीती रोडगे,डॉ.योगीराज चिद्रे,डॉ.नंदकिशोर पांचाळ,डॉ.प्रवीण मुंदडा,डॉ.महेश भातांब्रे,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.विष्णुकांत जाधव डॉ.विष्णुकांत मुंडे,डॉ.धनराज मुळे,डॉ.पंकज मुंडे आदींचे सहकार्य लाभले.


0 Comments