उदगीर रेल्वे स्टेशनच्या प्लॉट फॉर्मसमोर रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू,धडापासून शीर झाला वेगळा
उदगीर रेल्वे स्टेशनच्या प्लॉट फॉर्मच्या समोर एकाचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिल रोज बुधवारी सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली,सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गौतम साधुराम गायकवाड वय ४५ वर्ष राहणार हंगरगा ता.उदगीर जि.लातूर ह.मु.गोपाळ नगर उदगीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.१० एप्रिल रोजी सांयकाळी उदगीर रेल्वे स्टेशन प्लॉट फॉर्मच्या समोर रेल्वे खाली कटून मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले, स्टेशन मास्टर बनिसिंग मीना यांनी या घटनेची माहिती पोलीस हवालदार डफडे,एएसआय राऊत यांना दिली,घटनास्थळी पोलीस हवालदार डफडे व एएसआय राऊत यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले, सदर व्यक्तीचा रेल्वे खाली कटून धडापासून शीर वेगळा झाला होता,गौतम साधुराम गायकवाड हे उदगीर येथील अडत बाजारपेठेत हमालीचे काम करीत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
0 Comments