*विश्व शांतीसाठी मुस्लीम बांधवाकडुन प्रार्थना : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : पवित्र रमजान महिन्यात सर्व मुस्लीम बांधवांकडुन उपवास करुन नमाज पठन केले जाते. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव हे मानवाच्या कल्याणासाठी अजान पठन करुन अल्हाकडे प्रार्थना करतात. आपल्या उदगीर शहरात सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी बंधुत्वाची भावना जोपासुन पवित्र रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. विश्व शांतीसाठी मुस्लीम बांधवाकडुन नमाज पठन करुन मानव कल्याणासाठी प्रार्थना केली जाते असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांच्या 'ईद-उल-फित्र' कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देताना बोलत होते.
यावेळी मौलाना निजामोद्दीन काशमी, मुफ्ती नजमोद्दीन, ईदगाह कमिटी फारुखी रफिक अहेमद, वाहब उस्ताद, मुजीब खतीब, हाकानी बाबा, हाफिज सिद्दीकी, इरफान शेख, हबीब पिचेंनी, शफी हाशमी, शेख ऐनोद्दिन, समद बागवान, तनवीर ठाणेदार, साबेर पटेल,माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव समीर शेख, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, विधानसभा अध्यक्ष प्रविण भोळे, प्रा.श्याम डावळे, चेअरमन भरत चामले, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, अतिक शेख, अझहर मोमीन, शफी हाशमी, अभिजित औटे, प्रदीप जोंधळे, संघशक्ती बलांडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर मतदार संघात मुस्लिम बांधवांची संख्या ही
मोठ्या प्रमाणात असुन या भागातील सर्व समाजाला आपण न्याय दिला आहे. विशेषत: मागील काळात मस्जिद परिसराचे सुशोभिकरण व संरक्षण भिंत, रस्ते, पाणी, वीज आदी सुख सुविधा उपलब्ध करुन देवून या समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मला या समाजाने मदत केली असुन मी कायम आपल्यासोबत खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही ना.संजय बनसोडे यांनी दिली असुन येत्या काळात मुस्लीम समाजाच्या पाठीशी सदैव मी उभा असल्याचे सांगितले.
यावेळी ईदगाह मैदानावरील संरक्षण भिंत बांधकामासाठी १ कोटी रुपयाचा निधी दिल्याबद्दल ईदगाह नियोजन कमिटीच्या वतीने क्रीडा मंत्री ना.संजय बनसोडे यांचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments