उदगीर राज्य उत्पादन शुल्क व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्तिक कारवाईत,१० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मद्य साठा जप्त
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभाग व कर्नाटक राज्य उत्पादन विभाग शुल्क यांच्या वतीने सयुक्तिक कारवाईत १६ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात कारवाई करीत हातभटटी दारु ८९० लिटर, रसायन - ९ हजार ६०० लिटर, देशी दारु २१४ लिटर, विदेशी दारु ८ लिटर, ताडी १४५ लिटर तसेच ५ वाहन असा एकूण १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकूण ४६ गुन्हे नोंद करुन ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून ज्यामध्ये एकूण मद्याची किंमत ५ लाख १६ हजार २५५ रुपये आहे.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसारै लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री/वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारला असुन अवैध मद्य विक्री/वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले असुन, सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.
या कारवाईत उदगीर विभागाचे निरीक्षक आर. एम. चाटे, लातूर निरीक्षक आर. एस. कोतवाल, भरारी षथक निरीक्षक टि. एस. कदम, दुय्यम निरीक्षक ए. के. शिंदे, बी. आर. वाघमोडे, एन. पी. रोटे, मोनिका पाटील, रेणुका सलकर, बालाजी कावळे, एस. पी. मळगे, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, मंगेश खारकर, निलेश गुणाले, जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, विक्रम परळीकर, पुंडलिक खडके यांनी व कासारशिरी पोलीस स्टेशनचे दुय्यम निरीक्षक एस. सी. भुजबळ व हेड कॉन्स्टेबल घोरपडे, शिरसाट, लवटे, नागमोडे, सोनटक्के यांनी तसेच कर्नाटक Excise चे उप-अधीक्षक रवी मुरगडे, बिदरचे निरीक्षक गोपाल पंडीत, शब्बीर बिरदार, रविकुमार पाटील व दुय्यम निरीक्षक सादिक पाशा यांनी सहभाग नोंदविला.
0 Comments