Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून निलेवाड कुटूंबियांचे सांत्वन*

*क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून निलेवाड कुटूंबियांचे सांत्वन*

*उदगीर* : तालुक्यातील लोहारा-उदगीर रस्त्यावरील दुध डेअरीजळ बुधवारी दि.१० एप्रिल रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास करडखेलकडे जात असलेल्या एका दुचाकीला डस्टर गाडीने धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात अनुपवाडी (ता. उदगीर) येथील विशाल भिवा निलेवाड (वय- २२) व आकाश धोंडीबा निलेवाड (वय-२३) या दोघा चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेने माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी अनुपवाडी येथे निलेवाड कुटूंबियांची भेट घेवुन सांत्वन करुन धीर दिला.

यातील मयत विशाल निलेवाड यांचे १८ एप्रिलला लग्न होते. लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी ते करडखेल येथे जाणार होते. करडखेल येथे जाण्याआधीच त्यांना लोहाऱ्या जवळ काळाने घाला घातला आहे. 
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, रोहिदास कुंडगीर, अनुपवाडीचे सरपंच सलगरे रामेश्वर यांच्यासह प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात