Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी घेतला विविध समिती, पथकांचा आढावा*

*निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी घेतला विविध समिती, पथकांचा आढावा*

लातूर, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी शासकीय विश्रामगृह येथील कार्यालयात निवडणूक खर्च विषयक विविध समिती, पथकांचा आढावा घेतला.

अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, अतिरिक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे प्रमुख अप्पासाहेब चाटे, आयकर विभागाचे संजय पानसरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्यासह विविध पथकातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावी. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांकडून होणार नाही, तसेच मतदारांना कोणतेही प्रलोभन दाखवून मतदानाचे आवाहन केले जाणार नाही, याबाबत सर्वांनी सतर्क राहावे. प्रचारासाठी वापरण्यात येणारी विविध माध्यमे, जाहिराती, सभा, मिरवणुका यामध्ये होणाऱ्या प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवावे. मतदानासाठी पैसे, मद्य वाटपासारखे प्रकार घडणार नाहीत, याची संबंधित पथकांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. बॅनर्जी यांनी केल्या. 

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, पोलीस विभाग, सी-व्हिजील, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, स्थिर निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ निरीक्षण पथके यांचाही निवडणूक खर्च निरीक्षक श्री. बॅनर्जी यांनी घेवून निवडणूक कामकाजाबाबत सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात