Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण पोलिसांनी केला कुंठण खाण्याचा भांडाफोड,चार महिला, चार पुरुष पोलिसांच्या ताब्यात दोन महिला व चार पुरुषांवर गुन्हे दाखल.

ग्रामीण पोलिसांनी केला कुंठण खाण्याचा भांडाफोड,चार महिला, चार पुरुष पोलिसांच्या ताब्यात दोन महिला व चार पुरुषांवर गुन्हे दाखल.


दोन पिडीत महिलेची महिला सुधारगृहात रवानगी

उदगीर:ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मारवाड कॉलनी परिसरात कुंठण खाण्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कुंठण खाण्याचा भांडाफोड केला व आठ जणांना ताब्यात घेवून सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत,तर दोन पिडीत महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मारवाड कॉलनी सोमनाथपूर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी १३ एप्रिल रोज शनीवारी सांयकाळी  सहा वाजेच्या सुमारास धाड टाकली असता दोन आरोपी महिला दोन पीडित महिला दोन पुरुष व दोन अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले,आरोपी महिला व आरोपीची मुलगी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून घेऊन कुंठण खाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कुंठणखाणा चालवताना मिळून आले,विठ्ठल मारोती केंद्रे वय ३० वर्ष राहणार तळ्याचीवाडी ता.कंधार,विठ्ठल भगवान नरसिंगे वय ३५ वर्ष राहणार निळकंठ ता.औसा,व दोन अल्पवयीन मुले वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रवृत्त करताना मिळून आले,घटनास्थळाच्या दोनशे मीटरच्या आत सार्वजनिक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथपूर,व महादेव मंदिर आहे. अशा ठिकाणी हा कुंठण खाणा सुरू होता.पोलीस उपनिरीक्षक रवि केरबाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून विठ्ठल मारोती केंद्रे,विठ्ठल भगवान नरसिंगे,दोन महिला,व दोन अल्पवयीन मुले असे एकूण सहा आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन २०८/२४ कलम ३७०.३४ भादवी सह कलम ३,४,५,७,अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये १३ एप्रिल रोज शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दोन पिडीत महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.एक महिन्यापूर्वीही ग्रामीण पोलिसांनी नाईक चौक येथे कुंठण खाण्यावर धाड टाकून कारवाई केली होती,

Post a Comment

0 Comments

जाहिरात