Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश एकसंघ : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश एकसंघ : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

*मी सदैव आपला लोकसेवक म्हणून काम करणार* 

*माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला*

*उदगीर* : स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांनी दिलेली शिकवण व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो. 
जगात डाॅ.बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश एकसंघ असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी भंते धम्मबोधी, भंते नागसेन बोधी,
 माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सिद्धेश्वर पाटील, रामराव बिरादार, देविदास कांबळे, उदय मुंडकर, ज्ञानेश्वर पाटील, समीर शेख, 
प्रा.मल्लेश झुंगास्वामी, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, इब्राहिम पटेल, जितेंद्र शिंदे, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, सुभाष धनुरे, दयानंद शिंदे,अविनाश वाघमारे, सतिश कांबळे, नवनाथ गायकवाड, अरुण उजेडकर, प्रफुल्ल उदगीरकर, इब्राहिम देवर्जनकर, राहुल सुतार, बाबासाहेब सुर्यवंशी, माधव कांबळे, गौतम कांबळे, प्रा.श्याम डावळे, वसंत पाटील, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, गेल्या अनेक दशकापासुन उदगीर शहरात विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी समाजबांधव व आंबेडकरप्रेमी जनतेतून होत होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा जळकोट व उदगीर शहरात येत्या काही महिन्यात उभारणार असल्याची ग्वाही दिली.

धम्मदिक्षा घेण्यासाठी विहाराचे काम पुर्णात्वाकडे जात असुन महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बौध्द विहाराची निर्मिती उदगीर शहरात होत आहे. येत्या काळात उदगीर शहरात ४० फुटाचा महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणार असुन त्यामध्ये २५ फुटाचा चबुतरा आणि १५ फुटाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व तरूणांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन एकसंघ राहावे असे आवाहन ही यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी उदगीर शहरातील विविध प्रभागातील जयंती महोत्सव समितीला  ना.बनसोडे यांनी भेटी देवून समाजबांधवांना भिमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात