Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर मध्ये पदवी प्रदान समारंभ संपन्न*

*धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर मध्ये पदवी प्रदान समारंभ संपन्न*

उदगीर(प्रतिनिधी) :- धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये प्रवेशित झालेल्या तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक अंतर्गत साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम व एक वर्षाचा आंतरवासियता प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या एकुण ५६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पदवी प्रमाणपत्र वितरण-प्रदान समारंभ दिनांक:-१८/०४/२०२४ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूरचे सदस्य साहेबराव जाधव हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर लातूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले,उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर,पशुवैद्यकीय महाविद्यालय,उदगीरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नंदकुमार गायकवाड,धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.अलका भंडारे,डॉ.साईराम श्रीगिरे,डॉ मंगेश मुंढे,डॉ.अविनाश जाधव हे उपस्थित होते. 
कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरीक्षचे प्रतिमा पूजन-स्तवन व दीप प्रज्वलनाने झाली.
या प्रसंगी बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले की वैद्यकीय व्यावसायिकानी सामाजिक नीतीमूल्यांची जपणूक करीत आरोग्य सेवा टिकवून ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे.प्रत्येकाने विविध निवडणुकीत संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावले पाहिजे जेणेकरून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्याचा लाभ होईल.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रामधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना संशोधन वृत्ती बाळगणे गरजेचे आहे.विविध चिकित्सा पद्धतीच्या पदवीधारकांनी सदैव चिंतनशील राहून आपापल्या क्षेत्रातील नवनवीन व अद्ययावत ज्ञानाचा फायदा रुग्णांना देण्यासाठी कार्यरत राहावे.
अध्यक्षीय समारोपात बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य साहेबराव जाधव म्हणाले की वैद्यकिय शाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये वैयक्तिक व्यक्तिमत्व विकासासोबतच स्वतःमध्ये समुपदेशन शैली वाढविली पाहिजे जेणेकरून रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांना विविध आजारासंबंधी माहिती देताना त्याचा उपयोग होऊ शकेल.
याप्रसंगी डॉ.नंदकुमार गायकवाड व प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रशांत बिरादार यांनी तर सूत्रसंचालन डॉ.मयुरी ठाकूर तथा आभार प्रदर्शन डॉ.नामदेव बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गुरूराज वरनाळे,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.मधुमती चिद्रे डॉ.राधिका पाठक,डॉ पुष्पा गवळे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.अमोल पटणे,डॉ.राखी वरनाळे,डॉ.रश्मी चिद्रे,डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.स्नेहलता पाटील,डॉ.चरणदास गाडेकर,डॉ.शितल घोरबांड,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.विष्णुकांत जाधव,डॉ.शिवकुमार मरतुळे, डॉ.उषा काळे,डॉ.रश्मी सुखदेवे,डॉ.प्रिती रोडगे तथा निओफाइट्स २०१८-१९ या शैक्षणिक वर्षी प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
सदरील कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी आणि तसेच प्रथम ते चतुर्थ वर्ष बी.ए.एम.एस.चे विद्यार्थी-विद्यार्थिनी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी तथा निओफाइट्स २०१८-१९ या वर्षीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात