झेंडा क्रांतीचा रोविला, मार्ग समतेचा दाविला...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन : विविध कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन व वाचनातून प्रबोधनाची पहाट निर्माण केली : दलितमित्र बालासाहेब शिंदे*
अतनूर ( प्रतिनिधी ) - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त येथील मुख्य कार्यालयात विविध सेवाभावी संस्थांसह, महिला मंडळा च्या वतीने सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाशझोत टाकताना म्हणाले की, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथांवर नितांत प्रेम केले, तसेच ते सातत्याने आपल्या ग्रंथांमध्ये रममाण असायचे. ग्रंथांच्या अफाट संग्रह आणि वाचनातूनच त्यांच्यातील मन्वंतर जागविणारी पत्रकारिता उभी राहिली. आपल्या लेखन व वाचनातून भारतात प्रबोधनाची पहाट निर्माण झाली, असे विचार दलितमित्र बालासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी हिपळनारी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्र शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र शिंदे उपस्थित होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वतीने लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, कुणबी मराठा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. शुभांगना व्यंकटराव कणसे, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा सौ.संध्या बा.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, सचिव सौ. संध्या बाळासाहेब शिंदे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल.अतनूरकर, श्री.गोविंदा मेडिकलचे मालक कैलास सोमुसे-पाटील, अविनाश शिंदे, सौ.शोभा शिंदे, सौ.मोहिनी शिंदे, कुमारी मयुरी शिंदे, व्यंकटेश शिंदे यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
0 Comments