उदगिरात दुचाकीस्वारांंनी १ लाख ३० हजारचे २ मोबाईल पळविले; दोघांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा..
उदगीर शहरातील सावरकर चौक भागातील जिजाऊ नगर येथे एकजण पायी चालत जाताना पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांंनी १ लाख ३० हजार रुपयांचे हातातील दोन मोबाईल हिसका देऊन पळवून घेऊन गेले. याप्रकरणी मंगळवारी (९ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.८ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास शहरातील सावरकर चौक भागातील जिजाऊ नगर येथे दोन अज्ञात आरोपीनी संगणमत करुन फिर्यादी हे त्यांचे घराकडे जात असताना त्यांचे पाठीमागुन मोटार सायकलवर येवुन फिर्यादीचे हातातील आय फोन १५ प्रो कंपनीचा १ लाख १० हजार रुपये किमतीचा व गुगल पीक्सल ६ ए कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा असे दोन मोबाइल ज्याची अंदाजे एकुण किमत १ लाख ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल हिसाकावुन घेवुन मोटार सायकलवर पळुन गेले आहे.
याप्रकरणी आकाश संजय हाळीघोंगडे (रा. सावरकार चौक जिजाउ नगर शेल्हाळ रोड उदगीर ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरुण उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.२०१/२०२४ कलम ३९२, ३४ भादविनुसार अनोळखी दोन इसमाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत.
0 Comments