नागलगाव येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू,दोन दिवसानंतर आढळला मृतदेह
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथे एकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तानाजी अण्णाराव नागलगावे वय ४८ वर्ष हे ७ एप्रिल रोजी सांयकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाले होते,दोन दिवस त्याचा गावात व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता मात्र कुठेही मिळून आला नाही,दोन दिवसांनंतर ९ एप्रिल रोज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागलगावा जवळ असलेल्या तळ्याच्या खाली असलेल्या कणमुचके या शेतकऱ्यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली.ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जि. एन.जगताप,पोलीस नाईक केंद्रे,पोलीस नाईक लटपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत तरंगत असलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले,व घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले,या घटनेची उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments