उदगीर तालुक्यातील अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश
उदगीर:- सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाकडून, नेत्याकडून तरुणाईचा भ्रमनिराश होताना दिसत असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्यातून राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या तरुण वर्गाला आश्वासक नेतृत्व फक्त राज ठाकरे यांच्या रूपाने दिसत असल्याने तसेच लोकसभा निवडणुका सुरू असताना देखील इतर पक्षात न जाता सध्या युवा तरुणांचा ओढा मनसेकडे येताना दिसत आहे,याचाच प्रत्यय गेल्या काही महिन्यापासून उदगीर विधानसभेत दिसत आहे,गेल्या सहा महिन्यात पाचवा पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला असून उदगीर मनसेमध्ये मोठ्या संख्येने तरुण पक्षात दाखल होत आहेत,मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड व मनसे तालुका सचिव सुनील तोंडचिरकर यांच्या पुढाकाराने श्रीनिवास पाटील यांच्या नेतृत्वात उपाध्ये जय, मुदाळे दिगंबर,आदित्य बोडके, सुतार पृथ्वीराज, जांभळे आदित्य, श्री ऋषिकेश केंद्रे,धनशेट्टे अमोल, खडके भीम, कृष्णा अनदारे, शुभम विनचुरे,मयुरेश मुसळे, बेळकुंदे आदित्य, रितेश देवराल,विजय गायकवाड आदी तरुणांनी २ मे रोज गुरुवारी मनसेमध्ये प्रवेश केला,यावेळी मनसेचे शहराध्यक्ष संतोष भोपळे, कार्यालय प्रमुख भानुदास राजेकर, विनोद चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments