Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

परम रहस्य ग्रंथात सर्वोच्च मानवी तत्वज्ञानाचे सार - डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज

परम रहस्य ग्रंथात सर्वोच्च मानवी तत्वज्ञानाचे सार - डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज

उदगीर येथील अखंड शिवनाम सप्ताहास भाविकांचा उदंड प्रतिसाद रंभापुरी जगदगुरु डाॅ.वीरसोमेश्वर महास्वामीजीच्या आशिर्वचनाचा लाभ घ्यावा.

 उदगीर (प्रतिनिधी) : वीरशैव लिंगायत हा श्रेष्ठ धर्म आहे. ग्रंथराज परमरहस्यात मूलभूत मानवी जीवनमूल्ये असून संतशिरोमणी मन्मथ स्वामींची शिकवण सर्व सद्भक्तांनी समजून घ्यावी. मन्मथ स्वामींची प्रज्ञा अफाट होती. मन्मथ स्वामीकृत परमरहस्य ग्रंथ हा शंकर-पार्वती यांचा हृद्य संवाद असून महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याप्रमाणे आपणास कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवण्यास सांगते. आपला श्रेष्ठ धर्म वीरशैव लिंगायत धर्म ईश्वरभक्ती आणि नैतिकता शिकवते, असे प्रतिपादन डोणगाव-उदगीर मठाचे मठाधीश श्रीगुरु शिवाचार्यरत्न डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी आज (ता. १५) रोजी सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आपल्या अमृतवाणीतून केले. श्री. सद्गुरू हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी ते भाविक भक्तांना हितोपदेश करत होते.
   आपल्या आशीर्वचनात स्वामीजी निरुपण करताना पुढे म्हणाले की, आज श्रीगुरु हावगीस्वामींच्या कृपेने पाऊस पडून वातावरणात गारवा निर्माण झाला आणि संत्रस्त भाविकांना गारवा मिळाला. अध्यात्म माणसाला आनंद देते, सद्गुण बहाल करते. अध्यात्मिक संगतीत चांगला माणूस निपजतो.  भक्ती श्रेष्ठ आहे. नामाच्या पुनरावृत्तीने दुष्कृत्यावर, अहंकार, आसक्ती आणि क्रोधावर विजय प्राप्त करू शकतो, असे मौलिक प्रतिपादनही स्वामीजींनी करून उपस्थित भाविकांना आत्मबोध दिला.
    वीरशैव लिंगायत धर्माची महासभा उद्या गुरुवार (ता. १६) रोजी दुपारी चार वाजता जगद्गुरु वीर सिंहासनाधीश्वर डॉ. वीर सोमेश्वर शिवाचार्य महाराज, रंभापुरी पिठाचे महास्वामीजी भागवत पादंगळू यांच्या सान्निध्यात होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात