Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*नव्याने उभारण्यात येत असलेल्या बुध्द विहाराची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी*

*नव्याने उभारण्यात येत असलेल्या बुध्द विहाराची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी*

*संबंधितांना काम तत्परतेने व जलद गतीने करण्याच्या सुचना*

*उदगीर* : शहरातील तळवेस येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या बुद्धविहाराची पाहणी दि.१३ मे रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी अचानक भेट देवुन केली. गुलबर्गाच्या धर्तीवर अतिशय भव्य - दिव्य असे बुध्द विहार उदगीर शहरात उभारणार असल्याचा शब्द क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी समाजबांधवांना दिला होता. तो या बुध्द विहाराच्या उभारणीतुन आता पुर्णत्वाकडे जात आहे.
मराठवाड्यातील अतिशय सुंदर आणि देखणे बुध्द विहार उदगीर शहरात उभारले जात असून येत्या काही दिवसातच या बुध्द विहाराचे काम पूर्ण होवून ते समाजबांधवांसाठी खुले होईल. या विहाराचा भव्य - दिव्य सोहळा लवकरच आयोजीत करुन समाजबांधवांना एक ऊर्जा देणारे व भावी पिढीला संस्कार देण्याचे काम या बुध्द विहाराच्या माध्यमातुन होणार आहे. 
उदगीर मतदार संघात मोठ्या प्रमाणात समाजबांधव वास्तव्यास असुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून या भागात दर्जेदार बुध्द विहाराची निर्मिती करण्यात आली आहे.
या विहाराचे काम जवळपास पुर्णात्वाकडे गेले असुन अतिशय भव्य असे विहार उदगीरच्या वैभवात भर टाकत आहे. उर्वरीत विहाराचे राहिलेले काम संबंधितांनी अतिशय तत्परतेने व जलद गतीने करण्याच्या सुचना यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
यावेळी माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी नगरसेवक फय्याज शेख, बामणीचे सरपंच राजकुमार बिराजदार, कैलास पाटील, अनिल सोमवंशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात