Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहर व परिसरात लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या गफार ऊर्फ बबलू इस्माईल पठाण यांच्यावर एम.पी.डी.ए.अंतर्गत कारवाई

उदगीर शहर व परिसरात लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या गफार ऊर्फ बबलू इस्माईल पठाण यांच्यावर एम.पी.डी.ए.अंतर्गत कारवाई

उदगीर ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात दाखल.

उदगीर:शहरात व ग्रामीण परिसरात लोकात दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करून उदगीर शहरासह परिसरात व्यावसायिकांना, गोरगरीब जनतेला भीती दाखवून खून करण्यासाठी अपहरण करणे,अपहरण करून एखाद्या व्यक्तीला गैर कायदेशीर डांबून ठेवणे,आपखुशीने दुखापत करणे,मालमत्ता जबरीने घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करणे,बेकायदेशीर जमाव जमविणे,धाक दाखवणे,शिवीगाळ व मारहाण करणे,फसवणूक करणे,लोकांकडून खंडणी मागणे,खंडणीसाठी एखाद्या व्यक्तीला नुकसान हानी पोहचवणे इत्यादी गंभीर अपराध करण्याच्या सवयीचा होता म्हणून गफार ऊर्फ बबलू इस्माईल पठाण वय ३१ वर्ष राहणार समता नगर उदगीर यांच्यावर उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत,त्यांना बऱ्याच वेळा अटक करून प्रभावी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वर्तणुकीत कसल्याच प्रकारचा बदल झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे महाराष्ट्र झोपडपट्टीदादा,हातभट्टीवाले,औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स),वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचे अधिनियम १९८१ चे कलम ३ (१) अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्याकरीता लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार,गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले,पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, प्रदीप घोरपडे,पोलीस नाईक नाना शिंदे,सिद्धेश्वर स्वामी,नामदेव चेवले,राजकुमार देवडे,यांनी सविस्तर अहवाल तयार करून जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये गफार उर्फ बबलू इस्माईल पठाण यास १५ मे २०२४ रोजी एम.पी.डी.ए.कायदा कलम ३ (१) अन्वये अटक करून लातूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमूळे उदगीर शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात