वीरशैव भक्तांनी सदाचाराचे नित्य आचरण करावे - शिवाचार्य श्री. शिवानंद महास्वामीजी
उदगीर (प्रतिनिधी) : नैतिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वच बाजूंनी वीरशैव लिंगायत धर्म परिपूर्ण आहे. वीरशैव धर्मात सदाचाराला फार महत्त्व आहे. वीरशैव भक्तांनी सदाचाराचे नित्य आचरण करावे, असे प्रतिपादन गुरु बसवेश्वर विरक्त मठ, सायगाव (भालकी) चे मठाधिपती शिवाचार्य श्री. शिवानंद महास्वामीजी यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून केले.
उदगीर येथील अखंड शिवनाम सप्ताहाचा आज (ता. १६) रोजी चौथा दिवस शिवाचार्य महाराजांच्या सान्निध्यात आणि हजारो शिवसाधकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवभक्तांच्या आशीर्वाचनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ष.ब्र.डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज, म.नि.प्र.सिध्दलिंग महास्वामी,ष.ब्र. सिध्दऔंकार शिवाचार्य महाराज जगंमवाडी, ष.ब्र.श्रीपती पंडिताराध्य शिवाचार्य महाराज हळीखेड, ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य महाराज अणदुर म.नि.प्र.संगनबस्व महास्वामीजी निलंगा, आदी शिवाचार्य मंडळी उपस्थित होते
आशिर्वचनात शिवानंद महास्वामीजी म्हणाले की, बाराव्या शतकात परिवर्तन घडवून आणून माणूसकीचा झरा जीवंत केला. मानव शरीराला पाच ज्ञानेंद्रिय आहेत प्रत्येक इंद्रियाचे कार्य वेगवेगळे आहे. भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य ही भक्तांची अंगे आहेत. ज्या घरातून भोजनदान होते आणि भजनही होते ते घर स्वर्ग असल्याचेही ते म्हणाले. महात्मा बसवेश्वरांनी कर्म सिद्धांताला महत्व दिले. त्यांच्या काळात काश्मीरचा राजा-राणीनेही परिश्रम घेतले. परिश्रमाशिवाय कोणीही आयते खाऊ नये, सन्मार्ग सोडू नये ही आपल्या धर्माची शिकवण असल्याचेही स्वामीजींनी स्पष्ट केले.
मानवी मनातला अहंकार घालविण्यासाठी साधकाने हा सर्व संसार शिवाचा आहे असे मानावे. खरा साधक मृत्यूला भीत नाही, असे प्रतिपादन शिवाचार्य श्री. शिवानंद महास्वामीजी यांनी केले. यावेळी बाजिर समितीचू माजी सभापती सिध्देश्वर पाटिल, मंदिर समितीचे सुभाष धनूरे, उध्दव महाराज हैबतपुरे,किर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शिवराज नावंदे गुरुजी उपस्थित होते.न्नदाते सौ.प्रभावती विश्वनाथ म्हेत्रे, सौ.शिवकर्णा सुभाष बाचेवार, डाॅ.धनश्री अनुप चलवदे यांच्या हस्ते मंगलआरती संपन्न होऊन महाप्रसादाने समारोप झाला. वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गुरु हावगी स्वामी मंदिर सुवर्ण कळस सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती, पौरहित्य मंडळ,श्री गुरु हावगीस्वामी युवक मंडळाचे सगंम समगे, आकाश समगे, मोहित आष्टुरे,महेश समगे,आदित्य समगे,सोमनाथ मुळे,योगेश समगे,रोहित स्वामी,नसप्पा खंदारे,नागेश आठाणे,हावगीप्रसाद स्वामी,सुरेश आठाणे,रामेश्वर खंदारे,अभिषेक समगे,सुमित आष्टुरे ,सुनिल उप्परबावडे,शेखर कानमंदे,रतिष उप्परबावडे, सतिष उप्परबावडे,ईश्वर समगे,संदिप उप्परबावडे,सोपनिल खंदारे, प्रशांत स्वामी,औम उप्परबावडे.श्रीागुरु हावगीस्वामी महिला मंडळाचे श्रीमती लक्ष्मिबाई पांढरे, माजी नगरसेविका श्रीमती रेखाताई कानमंदे,शंकुंतला समगे, श्रीदेवी खंदारे,सुनिता मठपती,ज्योती समगे, प्रेमला समगे, ताराबाई मोदी,सविता समगे,सुरेखा समगे,कलावती आठाणे, कल्पना कानमंदे, सुरेखा मोदे,प्रेमला खंदारे,शिवमाला समगे, जगदेवी स्वामी, रेष्मा कापसे, कस्तुरा समगे,सुभद्रा कुंभार,शरणम्मा डाबरगिते, चंद्रकला करंजे, सुनंदा हळ्ळे, पुष्पा द्याडे, छबू द्याडे, अनिता नुत्ते, सुशिला हुडगे, सुनिता डोणगाव, लक्ष्मिबाई स्वामी , महादेवी गौरशेट्टे,विद्यावती कानमंदे, चन्नमा बिरादार, राजेश्री उप्परबावडे,रेवम्मा उप्परबावडे, बालिका कानमंदे,शोभा चपाते, संगीता गौरशेट्टे,रेखा पटणे,मिना कानमंदे यांच्या सह भक्त मंडळी परिश्रम घेत आहेत.
0 Comments