Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शिवणी व शिवणखेडमध्ये बिबट्या सदृश्य प्राणी; सतर्क राहण्याचे आवाहन



शिवणी व शिवणखेडमध्ये बिबट्या सदृश्य प्राणी; सतर्क  राहण्याचे  आवाहन

लातूर, दि.16 : चाकूर ताल्युक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये  बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तरी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केले.

 ग्रामस्थांनी शेतात रात्री मुक्काम करू नये. साथ सलोख्याचे नियम पाळून, चमूने, गटाने शेतकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करू नये, लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या सदृश्य प्राणी निदर्शनास आल्यास  त्याची माहिती वन विभाग, सरपंच, पोलीस पाटील यांना कळवावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात