लोहारा येथे बोलेरो पिकअपच्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
उदगीर तालुक्यातील उदगीर लातूर रोडवर लोहारा जवळ बोलेरो पिकअपच्या धडकेत दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ मे रोज रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की १९ मे रोज रविवारी रात्री ९ वाजता उदगीरकडे भरधाव वेगाने येणारा आंब्याने भरलेला बोलेरो पिकअप टेम्पो क्रमांक एम.एच.११ बी.एल.४७३७ च्या चालकाने दुचाकी क्रमांक एम.एच.२४ ए.एन.३९५६ या दुचाकीला जोराची धडक दिली,यात अथर्व विलास भंडारे वय १४ वर्ष राहणार हाळी ता.उदगीर,नवनाथ विठ्ठलराव बोडेवार वय १६ वर्ष राहणार अतनूर ता.जळकोट, आदिनाथ विठ्ठलराव बोडेवार वय १८ वर्ष राहणार अतनूर ता.जळकोट हे गंभीर जखमी झाले त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले लातूर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना अथर्व विलास भंडारे राहणार हाळी,व आदिनाथ विठ्ठलराव बोडेवार राहणार अतनूर ता. जळकोट या दोघांचा उपचारादरम्यान २० मे रोजी लातूर येथे मृत्यू झाला,तर नवनाथ विठ्ठलराव बोडेवार हे गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर लातूर येथे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अपघातात मृत्यू झालेले दोघे सख्खे मामा भाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अर्थव विलास भंडारे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यासाठी उदगीरकडे येत असताना हा अपघात घडला.
0 Comments