तहसीलदार राम बोरगावकर वाढवणा येथील वादग्रस्त रस्ता केला मोकळा
उदगीर: तालुक्यातील वाढवणा येथील वादग्रस्त असलेला रस्ता तहसीलदार राम बोरगावकर यांच्या आदेशान्वये २१ मे रोजी शेतकऱ्यास खुला करून देण्यात आला सदर नंबर बांधाचा रस्ता एक किलोमीटर लांबीचा व सव्वा आठ फूट रुंदीचा रस्ता असून येथील रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हा रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. याप्रसंगी उदगीरचे नायब तहसिलदार राजेश बेंबळगे, वाढवणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, वाढवणा मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश हिवरे,तलाठी आकाश आलुरे,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सोनवणे, मनमोहन केंद्रे,संजय कलकत्ते, शिवाजी केंद्रे,महिला पोलीस तयमुन मुजावर उपस्थित होते.
0 Comments