Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

ईश्वराचे नामस्मरण केल्याने ऊर्जा मिळते : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे

ईश्वराचे नामस्मरण केल्याने ऊर्जा मिळते : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे

सुवर्ण कलशारोहण सोहळ्यानिमित्त उदगिरात भक्तीमय वातावरण

उदगीर: आपण सर्वजण साधु संताच्या विचारावर चालणारे नागरीक आहोत संतानी दिलेल्या उपदेशाचे पालन आपण दैनंदिन जीवन करत असतो म्हणून तर आपण सर्वजन आप आपल्या पद्धतीने दान धर्म करतो तसे केल्याने पुण्य लाभते अशी शिकवण आपणास थोर संतांनी दिली आहे. माणूस म्हणून आपण सर्वजन एकच आहोत आपण सर्वजन धार्मिक कार्यक्रमाला महत्व देतो म्हणून आपल्याकडे संतांची प्रवचने होतात त्या संतांच्या प्रवचानातुन आपण ईश्वराच्या नामाचा जप करतो म्हणून ईश्वराचे नामस्मरण केल्याने आपणास आत्मशांती व ऊर्जा मिळते असे मत क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते श्री सदगुरु हावगीस्वामी शेतमळा, नांदेड बिदर रोड, उदगीर येथे आयोजीत श्री सदगुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह ५०५१ सदभक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण
सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी जगद्गुरू डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी, श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ संस्थांनचे मठाधिपती  डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, सिद्धलिंग महास्वामीजी देवणीकर, शिवानंद महास्वामीजी सायगाव, श्रीपती प्रभू पंडित आराध्य शिवाचार्य महाराज हाळीखेडकर, संगनबसवय्या महास्वामीजी निलंगा, शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे, शि.भ.प. तानाजी महाराज थोटवाडीकर, शि.भ.प. शिवराज नावंदे गुरुजी, राजेश्वर स्वामी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, शिवसेनेचे नेते अॅड.गुलाबराव पटवारी, समीर शेख, मनोज पुदाले, वसंत पाटील, संभाजी पाटील, सुभाष धनुरे, बाबुराव बिरादार, विमल गर्जे, दत्ता पाटील, अनिता हैबतपुरे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, श्री सदगुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा व अखंड शिवनाम सप्ताह ५०५१ सदभक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याच्या आयोजनाने
उदगीर शहरात सर्वत्र चैतन्य व भक्तीमय 
वातावरण आहे. मागील काळात श्री गुरु हावगीस्वामी मठात परमरहस्य पारायण, भजन, किर्तन, प्रवचन, आर्शिवचन विविध संताच्या वाणीतून तर होतच असते मात्र काल शहरातुन भव्य - दिव्य पालखी सोहळा काढण्यात आला होता. यावेळी लाखो भविक भक्त उपस्थित होते. या भाविकांना दररोज अन्नदान केले जात आहे.

भविष्यात एक लाख भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा घेणार असुन आपल्या सर्वांचे ५०० वर्षापासुनचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले असुन सर्व जाती धर्माला सोबत घेवुन आपण आपल्या देशाला पुढे घेवुन जाणार असुन विकसित भारत केल्याशिवाय आपण थांबांयच नाही. येत्या काळात मतदार संघातील शेकडो महिलांना आयोध्यावारी आपण घडवुन आणणार असल्याचा मानस क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक - भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात