अवलकोंडा येथे वाहनाचा भाडा मागितल्याने कोयत्याने मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा
उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे वाहनचालकांने भाडे मागितल्यावरुन चालकास ऊस तोडायच्या कोयत्याने मारुन जखमी केले. याप्रकरणी रविवारी (५ मे) रोजी रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास अवलकोंडा येथे फिर्यादीच्या घरा शेजारी फिर्यादीने आरोपीस चिंचा व लाकडे टाकलेले भाडयाचे पैस मागीतले म्हणुन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात उस तोडायच्या कोयत्याने मारुन जखमी केले व लाथाबुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी वाहनचालक शाहीद शमसुसाब बागवान (रा.अवलकोंडा ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रजाक नुरसाब बागवान, शेकीला रजाक बागवान, जीहाण रजाक बागवान (सर्व रा. अवलकोंडा ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments