अतनुरात अखंड हरिनाम सप्ताहास बुधवारपासून प्रारंभ
जळकोट तालुक्यातील अतनूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.काशी विश्वनाथ मठ संस्थान अतनूर यांच्या कृपेने जिवंत समाधी घेणारे श्री. सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १४८ व्या. संजिवनी सोहळयानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास बुधवारपासून (दि.८) मे सकाळी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज यांना रूद्राभिषेकाने प्रारंभ झाले असून, या सप्ताहात दि.१५ मे पर्यंन्त खालीलप्रमाणे या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा प्रमाणे सकाळी ६ ते ७ श्री.घाळेप्पा स्वामी यांचा रूद्राभिषेक, सकाळी ७ ते १० श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथ्यावरील भजन, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, राञी ९ ते ११ हरीकिर्तन, १२ ते ४ हरीजागर, पहाटे ४ ते ६ काकडाआरती असे नित्य नियमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात बुधवार ( दि.८ ) ह.भ.प. संतोष महाराज उदगीरकर यांचे किर्तन होणार आहे. दि.९ गुरुवार रोजी ह.भ.प. निलेश महाराज किल्लारीकर, दि.१० शुक्रवार रोजी ह.भ.प. मोहन महाराज खुर्दळीकर, दि.११ शनिवार रोजी ह.भ.प. राजेश पाटील गुंजर्गेकर, दि.१२ रविवार रोजी ह.भ.प. भुषण महाराज तळणीकर, दि.१३ सोमवार रोजी ह.भ.प. परमेश्वर महाराज शहापूरकर, दि.१४ मंगळवार रोजी दुपारी ह.भ.प. विश्वनाथ महाराज अतनूरकर, यांचे गुलालाचे किर्तन होऊन रात्री ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंते यांचे कीर्तन, दि.१५ रोजी ह.भ.प. पांडुरंग महाराज शिंपले यांचे काल्याचे किर्तन व समाप्ती होणार आहे.
हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महाराष्ट्रातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना सीमावर्ती व नांदेड, लातूर जिल्हा सरहद्दीवर वसलेल्या भाविक भक्तांचे दैवत आहे. तसेच अतनूर परिसरातील २८ गावातील वाडी-तांडा-वस्तीतील ग्रामस्थांची कार्यक्रमास मोठ्या संख्येवर उपस्थिती असते. अतनूर, गव्हाण, चिंचोली, गुत्ती, देवूळवाडी, कोळनूर, कोदळी, तग्याळ, डोरनाळी, वडगाव, डोंरनाळी, हिपळनारी, दापका ( गुंडोपत ) जि.नादेंड, मरसांगवी येथील भजनी मंडळ, विविध जिल्हयातून प्रसिध्द किर्तनकार येणार आहेत. यावेळी विणेकरी, ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख, मृदंगवादक, गायक, हरीपाठ प्रमुख, हरीजागर प्रमुख, काकडाआरती, चोपदार ईत्यादी प्रमुखांच्या निवडी नावानिशी केली असून यांना सकाळी, दुपारी आणि सायंकाळी गावातील, परगावातील अन्नदाते अन्नदान करणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अतनूर ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
0 Comments