Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भिमा तांडा येथे सुपारी मागण्यावरुन लोखंडी राॅडने मारहाण..

भिमा तांडा येथे सुपारी मागण्यावरुन लोखंडी राॅडने मारहाण..

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील भिमा तांडा येथे किराणा दुकानासमोर सुपारी मागण्याच्या कारणावरून एकाला लोखंडी राॅडने मारहाण करुन जखमी केल्या प्रकरणी मंगळवारी (११ जून) रात्री आठच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.९ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नितीन राठोड भीमातांडा यांचे किराणा दुकान समोर आरोपी ने फिर्यादीस सुपारी मागण्याचे कारणावरुन शिवीगाळकरुन दुकानच्या साईडला लावलेल्या लोखंडी राॅडने नाकावर मारुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सतीश निळकंठ चव्हाण (रा.टिकाराम तांडा ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बंडु नामदेव राठोड (रा.भिमातांडा ता.उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात