आतनूर येथे चार भावंडानी केली ४०० वृक्षांची लागवड
जळकोट:माझं लातूर हरित लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तसेच जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी,नायब तहसीलदार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आतनूर येथे ४०० वृक्षांची लागवड केली, जळकोट तालुक्यातील अतनूर प्रकाश गणपतराव सोमुसे,सुभाष गणपतराव सोमुसे,दिगंबर गणपतराव सोमुसे,शिवाजी गणपतराव सोमुसे,या भावंडाणी आतनूर येथील त्यांच्या शेतीमध्ये शासनाचा मोबदला न घेता जवळ जवळ ४०० वृक्षांची लागवड केली आहे,
यामध्ये केशरआंबा,दशेरी,बदाम,जांभूळ,चिकू,आवळा, चिंच,लिंबू,नारळ,संत्रा,पेरू,इत्यादीं झाडांची लागवड केली, उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसताना डोक्यावरून घागरीने झाडांना पाणी घालून झाडे जगविली आहेत,
आतनूर येथील हे चार भावंडे सातत्याने रात्रीचा दिवस करून या वर्षी ४४,४५ डिग्री तापमान असताना देखील सर्वच्या सर्वच झाडे जगवली आहेत.
0 Comments