*गुणवंत विद्यार्थी हेच आपल्या देशाची खरी संपत्ती : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : आज आपल्या मतदार संघातील हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. आपण कितीही मोठे झालो तरी आपली नाळ जमिनीशी असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय ठरवावे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन तो कृतीत आणुन आपले ध्येय गाठले पाहिजे. गुणवत्ते सोबतच संस्कार व देश प्रेमाची भावना विद्यार्थांनी अंगिकारावी कारण गुणवंत विद्यार्थीच हे आपल्या देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी प्राचार्य डाॅ.राजकुमार मस्के, लिंकन स्कुलचे संचालक दिलीपकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा.उषा कुलकर्णी, रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, साहित्यिक प्रा.रामदास केदार, धनंजय गुडसुरकर, सुनिल हावा, उपस्थित होते.
पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने सन २०१५ पासुन राष्ट्रीय लघुपट महोत्सव, रंगभरण, चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबीर, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व शैक्षणिक, विज्ञान प्रदर्शन, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन करते. सामाजिक बांधिलकी जपून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम रंगकर्मीच्या माध्यामातून होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे.
माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात मी सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीर असतो. कारण आपल्या देशाचे उज्वल भविष्यच आजचे हे गुणवंत विद्यार्थी आहेत. आपण कुठल्याही वावरत असलो तरी त्या - त्या क्षेत्रात कष्टाशिवाय यश नाही म्हणून आपण कष्ट केले पाहिजेत कुठल्याही गोष्टीचा आपण अहंकार बाळगू नये. यापुढेही आपण सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करुन आपल्या भागाचे नाव देशात करावे असा सल्ला ही विद्यार्थ्यांना ना.संजय बनसोडे यांनी दिला.
यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते (एम.पी.एस.सी.) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकारी झालेले अश्विन हणमंते, सुहास हणमंते, सारीका जमादार, नितीन वाघमारे यांच्यासह सीईटी व १० वी, १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.महेश मळगे यांनी केले. सुत्रसंचलन रसुल पठाण यांनी केले तर आभार प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी मानले.
कार्यक्रमास उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
********
0 Comments