तुळशीधाम येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह १३ लाख ७५ हजार ६०० रुपयांची घरफोडी
उदगीर: निडेबन येथे असलेल्या तुळशीधाम येथे अज्ञात चोरट्यांने घर फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निडेबन येथील तुळशीधाम सोसायटीत १४ जून रोज शुक्रवारी व १५ जून रोज शनिवारी मध्य रात्री अज्ञात चोरट्यांने घरात कोणी नसल्याची संधी साधून घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला, घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने ज्याची किंमत ९ लाख ८० हजार ६०० रुपये व रोख रक्कम ३ लाख ९५ हजार रुपये असा एकूण १३ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने चोरून नेला आहे, सोमेश्वर राचप्पा घाडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध १६ जून रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख,पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली,आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तिघा अज्ञात चोरट्यांने हे कृत्य केल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.
0 Comments