सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित; उदगिरात एकाविरुध्द गुन्हा
लहान मुलांचे अनैसर्गिक अश्लील कृत्य सोशल मिडियावर प्रसारित केल्या प्रकरणी शुक्रवारी (८ जून) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांच्या वतीने एक सी.डी.जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.८ नोव्हेंबर २०२२ पुर्वी यातील संशयीत आरोपीने लहाण मुलाचे अनैसर्गीक अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात तयार करुन तो सोशल मीडीयावर प्रसारीत केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी दिगंबर चेरले यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.३११/२०२४ कलम ६७ (ब) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार शकिल अहेमद शेख याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.
0 Comments