डीवायडर मधील वाढलेल्या झाडाच्या फांद्या अखेर प्रशासनाने कट केल्या
उदगीर शहरातील देगलूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाईक चौक दुभाजकात लावण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे एसटी बस चालकांना व इतर वाहनधारकांना झाडाच्या फांद्या चुकवत गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे,झाडाच्या वाढलेल्या फांद्या नगरपरिषदेने कट कराव्यात अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने १७ मे रोजी नगरपरिषदेकडे करण्यात आली होती,एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या झाडाच्या फांद्याचा सामना करावा लागत आहे अशीही मागणी करण्यात आली होती,नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन ८ जून रोज शनिवारी उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वसंतराव नाईक चौका पर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी डीवायडर मध्ये लावण्यात आलेल्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या कट करण्यात आल्या.
0 Comments