नळगीर येथे वानराने ७० वर्षीय महिलेला दिला जोराचा धक्का महिलेचा मृत्यू
उदगीर तालुक्यातील नळगीर येथे वानराच्या धक्क्याने महिलेंचा मृत्यू झाल्याची घटना ८ जून रोज शनिवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ८ जून रोज शनिवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास नळगीर येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती,कंबळबाई मारोती काळे वय ७० वर्ष ही महिला घराच्या छतावर असलेले कपडे घेण्यासाठी छतावर गेली असता घरांच्या बाजूला असलेल्या झाडावरून वानराने महिलेच्या अंगावर उडी मारली वानराचा जोराचा धक्का लागल्याने कंबळबाई मारोती काळे या छतावरून खाली दगडावर कोसळल्याने कंबळाबाई मारोती काळे या महिलेंचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यावर ९ जून रोज रविवारी ११ वाजता नळगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments