तोंडार येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री पाच घरे फोडली,सोन्या चांदीचे दागिने लंपास
उदगीर:तालुक्यातील तोंडार येथे चोरट्यांने धुमाकूळ घालून एकाच रात्री पाच घरे फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ३० जून रोज रविवारी पहाटे घडली आहे याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तोंडार येथील शिवकुमार गुरुनाथ खिंडे यांच्या घरातील रोख रक्कम २२ हजार रुपये,गंगाधर गुरुनाथ खिंडे यांच्या घरातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या,पाच ग्रॅमचे कानातील फुल,पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व १० तोळ्याचे चांदीचे दागिने पळविले, गंगाधर सूर्यवंशी यांच्या घरातून २ तोळ्याचे सोन्याचे दागिने, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, वाहेद महताब शेख यांच्या घरातून दीड तोळ्यांच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, पाच ग्रॅम चांदीची चैन रोख २५ हजार रुपये पळविले,धोंडीराम माधवराव बिरादार यांच्या घरातून दोन तोळ्याचा सोन्याचा हार अज्ञात चोरट्यांने पळविले तोंडार गावात एकाच रात्री पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकूण १० तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ३ लाख रुपये,३५ तोळे चांदीचे दागिने ज्याची किंमत १४ हजार रुपये, रोख रक्कम ४७ हजार रुपये असा एकूण तीन लाख ६१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांने घेऊन पोबारा केला.याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे हे करीत आहेत.
0 Comments